DCM Devendra Fadanvis Speech Full : प्रत्येक गरीबाला घर मिळणार, शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ मिळणार
DCM Devendra Fadanvis Speech Full : प्रत्येक गरीबाला घर मिळणार, शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ मिळणार जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा फडकत राहील अशा प्रकारची प्रार्थना मी करत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपला तिरंगा झेंडा आपली निशाणी असल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सरकार अॅग्री बिझनेस व्यवस्था उभारत आहे. तसेच प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सहा हजार कोटींचा निधी खर्च करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूरमध्ये फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी फडणवीस बोलत होते.























