एक्स्प्लोर

अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले फडणवीस?

Sharad Pawar : अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

औरंगाबाद: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं आहे. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, यावरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीची कोणतेही माहिती आपल्याकडे नसल्याचं फडणवीस म्हणाले आहे. फडणवीस हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर असून, चिखलठाणा विमानतळावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटले आहे. 

काय म्हणाले फडणवीस? 

"अजित पवार आणि शरद पवर यांच्या भेटीबाबत मला काहीही माहित नाही. याच कोणताही तपशील माझ्यकडे नाही. त्यांची भेट झाली, नाही झाली किंवा किती वेळ झाली या संदर्भात कुठलेही माहिती माझ्याकडे नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "मला याबाबत काहीही माहित नाही. जर उद्या असेल तर नक्की कळवतो," असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांची सावध भूमिका... 

काल जयंत पाटील यांच्यासह शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाले आहे. मात्र, असे असताना अजूनही राष्ट्रवादीत कोण कोणासोबत आहे, यावरुन संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात अजित पवारांनी शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याने यावरुन वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत फडणवीस यांनी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पवारांमध्ये झालेल्या भेटीबाबत मला काहीही माहित नसल्याचं म्हणत फडणवीस यांनी यावर अधिक बोलण्याचे टाळले आहे. 

फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर...

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार असून, महाआरोग्य शिबिराला ते हजेरी लावणार आहेत. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Camp) आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अयोध्या मैदानावर या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर यासाठी फडणवीस हे आज शहरात आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ajit Pawar : अशी घेतली अजित पवारांनी शरद पवारांची गुप्त भेट, जाणून घ्या दिवसभरातील घटनाक्रम

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget