Anil Deshmukh : जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख पहिल्यांदाच नागपूरात, कार्यकर्ते करणार जंगी स्वागत
सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपुरता येत असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 2021 मध्ये अटकेनंतर तब्बल 14 महिन्यांनी अनिल देशमुख हे नागपुरात येणार असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जाणार आहे. नागपूर विमानतळापासून त्यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली काढत फुलांचं वर्षाव करत जी पी ओ चौकापर्यंत स्वागत रॅली काढली जाणार आहे... या रॅली दरम्यान अनिल देशमुख मार्गातील साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन हे घेणार आहेत.. त्याशिवाय व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला तर संविधान चौकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करत ते घराकडे जाणार आहेत.























