WEB Exclusive : 'आम्ही पोस्टर लावले तर मग त्यांना का टोचलं?' मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगतापांचा भाजपवर हल्लाबोल
काय म्हणाले भाई जगताप
- आम्ही पोस्टर लावले तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते फाडून टाकले. माझा सवाल आहे की आम्ही पोस्टर लावले तर मग त्यांना का टोचलं. यांनी 93 देशांना लसी दिल्या आहेत. यावर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आपण ज्यांच्याकडून फॉर्म्युला घेतला आहे. त्यांना करारा प्रमाणे लस देणं बंधनकारक आहे. परंतु माझी माहिती अशी आहे की यांनी 16 देशांसोबत व्यवहार केले आहेत.
- दिल्लीत आमच्या 25 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आमचं म्हणणं आहे आम्हाला देखील अटक करा.
- काँग्रेस काळात 12 लसी करण्यात आल्या होत्या आणि त्या व्यवस्थित सर्वांजवळ पोहचल्या होत्या. भाजप सारखा व्यवहार आम्ही केला नाही. यांनी देशात नागरिक मरत असताना व्यवहार केला आहे.
- ज्या ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले आहेत त्यांना अटक करा. लोकांना देखील कळू द्या की भाजप पापावर पांघरून घालत असताना आम्ही ते लोकांसमोर आणतोय त्यावेळी जर आमच्यावर कारवाई होत असेल तर त्याचं स्वागत आहे
महत्त्वाच्या बातम्या























