एक्स्प्लोर

Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकरांना शिवसेना कोट्यातून आमदारकी? मुख्यमंत्र्यांनी केला फोन?

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकतंच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या संघर्षात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं होतं.

उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारीही दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतरही काँग्रेसने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. पण मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचं समजतं. तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं कळतं.

यातील इंटरेस्टिंग बाब म्हणजे उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचं कळतं. उर्मिला मातोंडकर यांचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. मात्र मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसंच राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं.

तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नावांबाबत गुप्तता
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावावरुन महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याची माहिती समोर येत आहे. तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नावांबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. राज्यपालांना नाव देत असताना नेमका कोणता निकष ठरवायचा याबाबत देखील संभ्रम असल्याचं कळतं. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार असा निकष आहे. या निकषाबाहेर नाव दिल्यास राज्यपाल त्या नावाना आडकाठी करु शकतात किंवा ही नाव फेटाळली जाऊ शकतात. या प्रकरणात कोर्टात जाण्याची वेळ आल्यास काय तयारी ठेवावी लागेल या सर्वच बाबींवर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरु आहे. त्यामुळे नाव ठरवण्यास वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्या व्हिडीओ

Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMaharashtra : तिजोरीत खडखडाट,कंत्राटदार चिंताक्रांत! कंत्राटदार महासंघ काय म्हणतो?Ajit Pawar : मविआत जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांशी अजित पवारांसोबत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
Video : फडणवीसांची रावडीस्टाईल... ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है''
Video : फडणवीसांची रावडीस्टाईल... ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है''
Embed widget