Swapnil Lonkar Suicide :मनसेचा नवी मुंबई ते विधानभवन पायी मोर्चा पोलिसांनी अडवला, कार्यकर्ते ताब्यात
मुंबई : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. यावरुन राज्य सरकारचा निषेध करत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे आपल्या कार्यकर्त्यांसह आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन विधानभवनाच्या दिशेनं निघाले आहेत. पायी निघालेल्या या मोर्च्यामध्ये मनसेचे 150 ते 200 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पण नवी मुंबई पोलिसांनी हा मोर्चा वाशी टोलनाक्या आधीच अडवला. नवी मुंबई पोलिसांनी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणावर बोलताना बोलताना गजानन काळे म्हणाले की, "स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर सरकारने केवळ एक समिती गठीत करण्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु ज्या एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सदस्यांचं पुरेसं संख्याबळ नाही. सध्या केवळ दोन सदस्य याचं काम पाहत आहेत. हे खूपच दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करत आम्ही आता विधानभवनाच्या दिशेनं निघालो आहोत. आज हजारो एमपीएससी उत्तीर्ण मुलं नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये असे अनेक जण आहेत ज्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास करुन मुलाखती देखील दिल्या आहेत. मात्र त्यांना अजूनही नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. सध्या सोशल मीडियावर देखील 'मी तहसीलदार,मी बेरोजगार' असे बोर्ड घेऊन असणाऱ्या तरुणांचे फोटो व्हायरल होतं आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची दखल सरकार घेणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही."
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने बुधवारी पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने एक पत्र लिहिलं होतं, ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली. इतकं टोकाचं पाऊल का टाकावं लागलं याची व्यथा मांडत स्वप्नीलने गळ्याला फास लावून घेतला. अखेरच्या काही तासांत त्याच्या मनात काय सुरु होतं याची उत्तरं त्याने पत्रातून दिली आहेत.
![New India Co-Oprative Bank : Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/dd5d7789b6c99a266cbc22b34947913e1739763439502718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/49a7f578f8e12a539494bd041ffea6ff173900578446390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/15ae83f1132b0dbaef7d30b5be21f17c173868237728290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/38fa284c032c1c71ff9243e9fef136c3173868170582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/7028fc352972d9db641d749b3122d7d1173867727623190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)