ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता : ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची काल परिवहन मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांना नवा पर्याय देण्यात आला आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आलाय. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज सकाळी ११ वाजचा पुन्हा बैठक होणार आहे.. आणि त्यात निर्णयाची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलीय़ एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याबाबत हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेता येणार आहे. ही बाब निदर्शनास आणून देत परब यांनी अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवला.