Sharad Pawar Meet CM Eknath Shinde : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
Sharad Pawar Meet CM Eknath Shinde : शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनावर सत्ताधारी महायुती आणि महाविकासआघाडीतील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याभरात ही दुसरी भेट आहे. या आधी 22 जुलैला भेट घेतली होती. मागील भेटीत मराठा -ओबीसी आरक्षण हा विषय होता. यासोबतच दुधाचा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देणे हा विषय होता. शरद पवार मुख्यमंत्री भेटीत कुणाच्या ही कारखान्यावर अन्याय होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. माञ तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक बापू पवार काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि विधान परिषदेची निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्यात आलं. यावर शरद पवारांनी प्रेमाने सांगून जर मागणी मान्य होत नसतील तर संघर्ष करू अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट होत आहे.आजच्या भेटीत देखील हा विषय चर्चेला येईल.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
