एक्स्प्लोर
Prabodhankar Thackeray Book Controversy | कस्तुरबा Hospital मध्ये पुस्तक फेकल्याने वाद, राजकीय पडसाद!
मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात निवृत्त कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे 'देव आणि देवळांचा धर्म' हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकावरून रुग्णालयात वाद निर्माण झाला. महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तक फेकून मारत माफी मागायला लावली. या घटनेनंतर कामगार संघटनेने पुस्तक फेकणाऱ्या सहायक अधिसेविका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देण्यात गैर काय, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. दरम्यान, किशोरी पेडणेकर आणि ठाकरे यांच्या शिवसेनेने आज दुपारी तीन वाजता कस्तुरबा रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. संजय राऊत यांनी प्रबोधनकारांचे पुस्तक देणे गुन्हा नसल्याचे म्हटले असून, हे पुस्तक हिंदुत्वाच्या ढोंगावर प्रखर भाष्य करते असे सांगितले. मंत्री संजय शिरसाट यांनी लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असल्याचे म्हटले. मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या घटनेला महाराष्ट्राचा अपमान म्हटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले की, "जिवंत प्रबोधनकार जहाल होतेच पण मरणोत्तर ते अनेकांना त्यापेक्षा अधिक दसपट तापदायक आहेत हे या घटनेवरुन सिद्ध झालं."
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















