ATS Charge Sheet : PFI ला 2047 पर्यंत देशात Islamic State स्थापन करायचं होतं, एटीएसचा खुलासा
पीएफआयला २०४७ सालापर्यंत देशात इस्लामिक राज्य स्थापन करायचं होतं असा मोठा गौप्यस्फोट एटीएसनं न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केलाय. हिंदू संघटनांना खिंडार पाडण्याचाही पीएफआयचा मोठा कट असल्याचंही एटीएसने आरोपपत्रात म्हटलंय. या आरोपपत्राची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली असून, चेंबूर, धारावी, कुर्ला, ठाणे, नेरूळ, पनवेल आणि मुंब्रा येथे पीएफआय सदस्यांनी घेतलेल्या गुप्त बैठकीत कट कारस्थानं रचली जात असल्याचंही एटीएसने म्हटलंय. पीएफआयचे सदस्य हे देश आणि सरकारनिरोधात कट रचत असल्याचंही एटीएसने न्यायालयाला सांगितलंय. मुस्लिम तरुणांची माथी भडकावून देशात हिंसाचार करण्याचं कारस्थान रचलं जात होतं, अशी खळबळजनक माहिती एटीएसने न्यायालयात दिलीय.
महत्त्वाच्या बातम्या





















