Parambir Singh : परमबीर सिंहांचे अखेर निलंबन; खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कारवाई
मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे. खंडणी, अॅट्रोसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
परमबीर यांच्या निलंबना संदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय एका खात्याचे प्रमुख असूनही ते वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत, असा ठपकाही ठेवण्यात आलाय.























