Mumbai Cruise Drugs प्रकरणी प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटावर मंत्री Nawab Malik यांची प्रतिक्रिया
सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे. मी आणि किरण गोसावी आणि मनिष भानुशाली हे बाहेरचे लोक होतो. क्रुझवर कारवाई दरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.11.30 दरम्यान मी बोर्डींग होते तिथे गेलो. तेव्हा मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेलं बघितलं. एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणलं. तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात वर बोलावलं. तिथे साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यानं मला ब्लॅंक पेपरवर सह्या करायला लावल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे ब्लॅंक पेपरवर कश्या सह्या करु असं विचारलं तेव्हा समीर वानखेडे तिथे आले आणि म्हणाले काय नाही होत तू कर सह्या. मी सह्या केल्या. 9 ते 10 ब्लॅंक पेपरवर मला सह्या करायला लावल्या. माझं आधारकार्ड मी त्यांना व्हॉटसअप केलं. पंच म्हणून जेव्हा माझी सही घेतली तेव्हा पेपर पूर्ण ब्लॅंक होते, असं साईलनं सांगितलं.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
