Mumbai University Senate Election : सिनेटचं निवडणूक स्थगितीमुळे विद्यार्थी संघटनांची नाराजी
१० सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आलीय. पुढील आदेश मिळेपर्यंत निवडणुकीचा हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनाकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय. ९ ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. आणि १० सप्टेंबरला निवडणूक होऊन १३ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार होता. पण निवडणूक कार्यक्रमा झाहीर झाल्यानंतर आठ दिवसांतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी उशिरा घेण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेऊन नंतर त्याचं परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला.























