![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mumbai Powai Stone Pelting : अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर दगडफेक,15 ते 20 पोलीस जखमी
मुंबई: मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पवईच्या (Powai) भीमनगर परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. जय भीमनगर (Jay Bhimnagar) हा झोपडपट्टीचा परिसर आहे. येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली. त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला. यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) जवान प्रोटेक्शन शील्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात बचावले. मात्र, या तुफान दगडफेकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.
दोन महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती त्यानंतर या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली.
![Amit Thackeray and Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एन्ट्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/587c757249f64fce739497f8b5e88f571718868077426719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![western Railway Mumbai : मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका; 30 ते 40 मिनिटे ट्रेन उशिरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/0abf3dea50ccdc25800f5231ba393a661718853647086719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray Shivsena Vardhapan Din : शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन; ठाकरे गटाकडून तयारीला वेग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/fa138e2654b3b86c42a111e6463e7d791718778354821719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray on Smarak : बाळासाहेबांच्या सानिध्यातील त्या सगळ्यांचा उल्लेख स्मारकात करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/f4ef83c625210be777d5445cea90f83c171870332023690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/fedb942ae2a8633c2af8c07bf44a2b29171861040426990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)