एक्स्प्लोर

18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महापालिका सज्ज,मात्र लसींचा पुरवठा होणं गरजेचं : किशोरी पेडणेकर

Maharashtra Corona Vaccination : केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याला परवानगी दिली आहे. याची सुरुवात 1 मेपासून संपूर्ण देशभरात होणार आहे. तसेच 1 मे रोजी लसींचा साठा उपलब्ध नसल्यास लसीकरण कसं होणार? अशी चिंताही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मोफत लसीकरण आणि लसींचा तुटवडा या प्रश्न ऐरणीवर असतानाच यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरण नेमकं कसं होणार यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र लसींचा पुरवठा देखील त्याप्रमाणात होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, "आपण जर प्रत्येक वॉर्डसाठी एक लसीकरण केंद्र देण्याचं ठरवलं तर, लसीकरणाचं प्रमाण वाढणार आहे. खासगी रूग्णालयांना देखील आपण लसीकरणासाठी परवानगी देत आहोत. त्यामुळे प्रत्येकजण आपलं मनुष्यबळ घेऊन तयार देखील राहणार, पण तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का? ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांत जशी लस उपलब्ध होत आहे, त्याप्रमाणे आपण लसीकरण करत आहोत. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करायचं आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे, पण जर लसच तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झाली नाही, तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल." 

"आपल्याला 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करायचं आहे. मात्र लसीकरणाचा साठा आल्यानंतर जे 45 वर्षांवरील कोमॉर्बिड लोक, तसेच जे 60 वर्षांवरील आहेत. ज्यांचा आता दुसरा डोस सुरु आहे. त्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रमही आपल्याला त्याच वेळी चालवावा लागणार आहे. त्यामुळे अद्यापही राज्य सराकार आणि महानगरपालिका यांच्यात बैठका सुरु आहेत.", अशी माहितीही महापौर पेडणेकर यांनी दिली आहे. 

महापौर पुढे बोलताना म्हणाल्या की, "राज्य सराकार आणि महानगरपालिका यांच्यात बैठका सुरु आहेत. 1 मे पासून लसीकरण निश्चितच सुरु होणार आहे, पण ते सुरु होत असताना, कुठे होणार? कुठल्या ठिकाणी पहिल्यांदा सुरु होणार, याबाबतचं नियोजन करण्यासाठी काही जणांच्या सूचना देखील आल्या आहेत. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाची विभागणी करावी लागणार आहे. सर्व वयोगट एकत्र करणं हे योग्य ठरणार नाही. कोविन अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर आणि लस मिळत असल्याची खात्री झाल्यावरच लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने गेलं पाहिजे." तसेच यासंदर्भात आयुक्तस्तरावर सध्या चर्चा सुरु आहे, अंतिम टप्प्यात जेव्हा सगळ्या गाईडलाइन्स येईल त्यावेळी यांसदर्भातील माहिती सर्वांना देण्यात येईल, असंही महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं.

मुंबई व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Divyanka Tripathi Shared Motherhood Experience: 'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
'ब्रेस्टफिडिंगमुळे होणाऱ्या वेदना... बाळाला फायदा पण, आईचं काय?'; दिव्यांका त्रिपाठीचं स्तनपानाबाबतचं 'ते' वक्तव्य VIRAL
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget