(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local Megablock : आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. या कालावधीत CSMT च्या दिशेकडे जाणाऱ्या आणि CSMT वरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. हार्बर मार्गावरील पनवेल - वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. शिवाय पश्चिम मार्गावरील मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक आहे. या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.