Thane Mumbai : मध्यरेल्वे मार्गावर 27 तासांच्या मेगाब्लॉक, ठाण्यातही कोपरीसाठी वाहतुकीत बदल
आज आणि उद्या तुम्ही प्रवासाचा बेत आखत असाल तर मुंबई आणि ठाण्यात वाहतूक व्यवस्थेत केलेले बदल लक्षात घेऊनच प्रवासाला निघाल. मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 27 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात झालीये.. कर्नाक आणि कोपरी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आलाय.. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवरही परिणाम होणार आहे. अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्यात. मध्य रेल्वेच्या या 27 तासांच्या मेगाब्लॉकचा फटका प्रवाशांना बसणार आहे. तसंच या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आलीये त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली





















