Mumbai : संघर्ष टाळण्यासाठी शिंदे समर्थक 1 दिवस आधीच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट देणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन उद्या असला तरी शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार आजच स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहणार आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ठाकरे गटाचे नेते आणि शिवसैनिक उद्या शिवाजी पार्कमधील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमतील. त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी शिंदे गटानं एक दिवस आधीच स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटानं आज दादरच्या सावरकर स्मारकात वारसा विचारांचा या परिसंवादाचं आयोजन केलंय. या परिसंवादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गटाच्या आमदारांचा हिंदुत्वाचा वर्ग घेणार आहेत.


















