MNS : मनसे नेते बाळा नांदगावकर रेशनिंग आयुक्तांच्या भेटीला,अधिकाऱ्यांना दिली घोटाळा करणा-यांची यादी
मुंबई आणि ठाण्यामध्ये होणाऱ्या रेशनिंग घोटाळ्याची सखोल चौकशी करावी यासाठी आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी रेशनिंग आयुक्तांची भेट घेतली. राज्यालील रेशनिंग घोटाळा थांबवावा आणि या संदर्भातील सर्वांवर कारवाई करावी आणि मोक्का अंतर्गत गुन्हे करावेत, तसच रेशनिंगच्या काळा बाजार करुन अवैध मार्गाने कमावलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या या काळात गरिबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यात त्यांच्या हक्काचे रेशन ही त्यांना मिळत नाहीये. या रेशनिंगच्या धान्याची परस्पर फ्लोर मिलला विक्री केली जात आहे. असा आरोप बाळा नांदगावकरांनी केला तसच यापुढे या रेशनिंगचा पुरवठा करणा-या भ्रष्ट दलालांना धान्य पुरवठा करण्याच कॉन्ट्रॅक्ट न देण्याची मागणी केली आहे. यावेळी मनसेने वरिष्ठ रेशनिंग ऑफीसरना नावे ही दिली आहेत.























