Kalyan Taloja Metro : कल्याण तळोजा मेट्रो नवी मुंबई मेट्रोला जोडणार, MMRA चा निर्णय
Kalyan Taloja Metro : कल्याण तळोजा मेट्रो नवी मुंबई मेट्रोला जोडणार, MMRA चा निर्णय
कल्याण-डोंबिवली-तळोजादरम्यान प्रस्तावित ‘मेट्रो १२’ मार्गिकेला नवी मुंबईतील बांधून सज्ज असलेल्या बेलापूर-पेंधर या मार्गिकेशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येत्या काही वर्षांत कल्याण ते बेलापूरदरम्यान ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सुलभ आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. तळोजापर्यंत ‘मेट्रो १२’ नेल्यानंतरही पुढे बेलापूपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना उलटसुलट प्रवास करावा लागू शकतो, ही बाब विचारात घेऊन एमएमआरडीएने ‘मेट्रो १२’ आणि नवी मुंबईतील ‘बेलापूर – पेंधर मेट्रो १’ मार्गिका एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. किमान दोन किमीने मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. पेंधर मेट्रो स्थानकात या दोन्ही मार्गिकांची अदलाबदल करून पुढे प्रवास करता येणार आहे. नव्या विस्तारीत मार्गिकेचे पुन्हा आरेखन करून बांधकामासाठी नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत.