Abu Azmi : वाढदिवसानिमित्त अबू आझमींची जंगी मिरवणूक,नियम धाब्यावर बसवणाऱ्या आमदारांना सूट का?
एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी त्याचा धोका कायम आहे.मात्र याचे भान नेत्यांना दिसत नसल्याचे वारंवार समोर येत आहे.आज मुंबई च्या शिवाजी नगर गोवंडी विभागाचे आमदार अबू आझमी यांच्या वाढ दिवसानिम्मित त्यांची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली.या शेकडोच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते.या वेळी फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.कहर म्हणजे या वेळी अबू आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचे प्रदर्शन देखील केले.या वेळी पोलीस मात्र बघाच्या भूमिकेत दिसून आले.या मुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.या बाबत त्यांना विचारले असता त्यांनी हे कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे सांगितले.तसेच ती तलवारी मारण्यासाठी नव्हती, आम्ही पूरग्रस्तांना मदत गोळा करीत आहोत अशी सारवा सारव केलेली आहे.























