एक्स्प्लोर

Covid-19 vaccination : BMC जर घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास तयार असेल तर आम्ही परवानगी देऊ : हायकोर्ट

मुंबई : मुंबई महानगरपालिका जर घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास तयार असेल तर आम्ही परवानगी देऊ. केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहण्याची गरज नाही, इथं एकएक दिवस महत्त्वाचा आहे, असं स्पष्ट मत बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी व्यक्त केलं. यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना गुरूवारी तातडीनं भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून जारी करण्यात आलेत. आणि एकप्रकारे हायकोर्टानं लसीकरण वेगात पूर्ण करण्यासाठी पालिकेला मुंबईत घरोघरी लसीकरण करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन यावर काय भूमिका स्पष्ट करते यावर गुरूवारी मुंबई उच्च न्यायालय महत्त्वपूर्ण निर्देश देण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकार दारोदारी जाऊन लसीकरण करण्यास उत्सुक दिसत नाही, असं स्पष्ट मत यावेळी हायकोर्टानं व्यक्त केलं. केंद्र सरकारतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टाला सांगितलं की, यासंदर्भात एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यातून वयोवृद्ध जेष्ठ नागरीकांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाण्यात मदत करण्याविषयी सुचवलेलं आहे असं सांगितलं. यावर नाराजी व्यक्त करत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले की, या समितीला वस्तुस्थितीची काहीही माहिती आहे, असं वाटत नाही. मुंबईची आपल्याला नीटशी कल्पना नाही, मात्र कोलकात्याच्या ज्या भागात त्यांचा जन्म झालाय तिथं इमारती अगदी एकमेकांना चिटकून आहेत. त्यामुळे काही चिंचोळ्या भागातून स्ट्रेचरही जाऊ शकत नाही. यावर त्यांच्यासोबत बसलेल्या न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी त्यांना सांगितलं की, मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाही, आजही इथं लाकडी जिने असलेल्या अनेक अरूंद इमारती आहेत जिथं प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरीक राहतात.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच सर्वसाधारणपणे पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यास जाणे शक्य नसल्याने त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील वकील ध्रुती कापाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केली आहे. त्यावर बुधवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, आपण घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना लस का देऊ शकत नाही? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. जर काही महिन्यांपूर्वीच आपण ही मोहिम राबवली असती तर विविध क्षेत्रांतील, समाजातील प्रमुख सदस्य ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचवता आले असते अशी खंतही गेल्या सुनावणीत खंडपीठानं बोलून दाखवली होती. अनेक देशात घरोघरी जाऊन लसीकणाची मोहिम सुरू करण्यात आली आहे. भारतात मात्र या सगळ्याची गोष्टी उशीरा सुरू होतात त्यांची प्रक्रियाही संथ असल्याचा टोलाही खंडपीठाने यावेळी केंद्र तसेच राज्य सरकारला लगावला.

बातम्या व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस
Zero Hour Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Munawar Faruqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Munawar Faruqui : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीही बिष्णोई गँगच्या रडावर? जीवाला धोका असल्याची माहिती; सुरक्षेतही वाढ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Embed widget