एक्स्प्लोर

MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?

MNS activist killed : रिक्षा चालकासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर मनसे कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली होती.

MNS activist killed, मालाड : कट मारल्याच्या वादातून रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला मालाडमध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. यातच मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.14) घडली आहे. आकाश माईन वय 27 असे हत्या झालेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्याच्या हत्येनंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. 

मनसेकडून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह...?

मुंबईच्या मालाड पूर्वेत मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बाबा सिद्दिकी यांना वेगळा न्याय आणि मनसे कार्यकर्ताला वेगळा न्याय का ? असा सवाल त्यांनी उपस्थित झालाय. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या हल्लाप्रकरणी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

अधिकची माहिती अशी की, मनसे कार्यकर्ता आकाश माईन वय 27 वर्ष दसरा निमित्त काल संध्याकाळी नवीन गाडी घेण्यासाठी मालाड स्टेशनवर गेला होता. मालाड पूर्वेत स्टेशन जवळ रिक्षावाल्याने कट मारल्यामुळे मनसे कार्यकर्ता आणि रिक्षावाल्याबरोबर बाचाबाची सुरू झाली. मलाड स्टेशनवर असलेले रिक्षा चालकाचा मित्र फेरीवाल्यांनी यावेळी गर्दी जमा करून दहा ते बारा लोकांनी मनसे कार्यकर्तावर हल्ला केला. रिक्षा आणि फेरीवाल्यांच्या या हल्ल्यात मनसे कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र रात्री बारा वाजता मनसे कार्यकर्त्याची मृत्यू झाला.

मनसे कडून पोलिसांवर आरोप करण्यात आला आहे. ज्या पद्धतीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवून दोन आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपीचे शोध घेत आहेत. त्याच पद्धतीने पोलिसांनी मनसे कार्यकर्तावर हल्ला प्रकरणी तपास वेगाने केली पाहिजे. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष/दिंडोधी विधानसभा भास्कर परब यांनी दिलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget