Diwali 2020 | सौदी अरेबीयातून आलेल्या आनंद साळवींनी सुरू केला घरगुती फुलांच्या कंदीलाचा व्यवसाय
सौदी अरेबियात गेल्या 10 वर्षापासून नोकरी करणारे आनंद साळवी मार्चमध्ये आपल्या गावी रत्नागिरीला देवाच्या पालखीसाठी आले होते. मात्र परत जाताना कोरोनामुळे जागतिक लॉकडाऊन झाल्याने आनंद साळवींना परत नोकरीवर रूजू होता आले नाही. त्यामुळे घरात बसलेल्या साळवी यांनी मिळालेला वेळ सत्कारनी लावण्याचे ठरवले. अंगात असलेल्या कलेचा वापर करीत त्यांनी गणपती उत्सवात फुलांचे डेकोरेशन केले. यातूनच पुढे घरगुती कंदील बनविण्याची कल्पना त्यांना सुचली. फुलांचा वापर केलेली दिवाळीचे कंदील मिळत नसल्याने आनंद साळवी यांनी फुलांचा वापर करून घरातच कंदील बनविण्यास सुरूवात केली. अक्रॅलीक फुले, धागा, फोम आदी साहित्यांचा उपयोग करीत आकर्षक असे कंदील आनंद साळवी यांनी तयार केली आहेत . विशेष म्हणजे यासाठी त्यांनी शेजारीपाजारी रहिवाशी असलेल्या महिलांना प्रशिक्षण देत त्यांनाही या कलेचा भाग बनविले. 250 ते 900 पर्यंत किंमतीला कंदील विकले जात असून online order देवून सुध्दा लोकांना फुलांचे आकर्षक कंदील बुक करता येणार आहेत.