Devendra Fadnavis on Sea Link Name : प्रस्तावित वांद्रे- वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव?
मुंबईतील प्रस्तावित वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.. ही मागणी पूर्ण होणार का ते पाहावं लागेल. तसं झालं तर त्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत १३ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये तीन प्रकल्पांबद्दल मागणी करण्यात आली होती. त्यातील कोस्टल रोडच्या नावाची मागणी रविवारी पूर्ण झाली. तसंच, मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव द्या अशी मागणी आहे.. तर कोस्टल रोडचा पुढचा टप्पा म्हणजेच वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव देण्याची मागणी फडणवीस यांनी केलीये.. त्यावर काय निर्णय होतो ते पाहावं लागेल.























