उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्या शंकरराव चव्हाणांच्या आठवणी, मुंबईत जलभूषण पुरस्काराचं वितरण
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या जलभूषण पुरस्कार चे आज सहयाद्री अतिथी गृह येथे वितरण करण्यात आले.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, गुलाबराव पाटील, दत्तात्रय भरणे, संजय बनसोड इत्यादी उपस्थित होते. प्रथम पुरस्कार हा दिवंगत सुनील पोटे यांना देण्यात आला.त्यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाल्याने त्यांची पत्नी मनीषा पोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.द्वितीय पुरस्कार अनिकेत लोहिया तर तृतीय पुरस्कार प्रवीण महाजन यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंकरराव चव्हाण यांचा वैज्ञानिक महामंडळ ला विरोध होता असे म्हणाले.तर शंकरराव यांच्या सरकार मध्ये प्रत्येक कॅबिनेट बैठकीनंतर प्रत्येक मंत्र्यांच्या घरी सर्व मंत्री सहकुटुंब जेवायला जात असत , आमचे सरकार बनले तेव्हा मुख्यमंत्री यांच्या घरी जेवण झाले,माझा घरी जेवण झाले असे आता वाट बघत होतो बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचे निमंत्रण ची वाट बघत होतो अशी कोपरखळी त्यांनी दिली.तर या वर मुख्यमंत्री यांनी थोरात यांनी कोरोनाचे कारण दिले असले तरी तुम्ही बोलवा आम्ही स्वबळावर तुमच्या घरी जेवायला येऊ असे म्हटले.