Mumbai Local : नालासोपारा रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांचा गोंधळ
पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलचे दरवाजे नालासोपारा स्थानकात न उघडल्यामुळं नालासोपाऱ्याच्या प्रवाशांना थेट विरारला जावं लागल्याची घटना काल रात्री घडली. रात्री सव्वा अकराच्या सुमारास चर्चगेटहून नालासोपारा स्थानकात येणाऱ्या एसी लोकलचे सर्व दरवाजे तांत्रिक कारणामुळं उघडले गेले नाहीत. फक्त गार्डच्या बाजूचे तीन दरवाजे उघडले, पण बाकीचे नऊ दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळं नालासोपाऱ्याच्या प्रवाशांना थेट विरार स्थानकापर्यंत जाण्याची वेळ आली. त्यामुळं संतप्त प्रवाशांनी मग एसी लोकलच्या ड्रायव्हरच्या केबिनसमोर आपला राग व्यक्त केला. अखेर मध्यरात्री सव्वा बाराच्या चर्चगेट लोकलनं हे सारे प्रवासी आपापल्या घरी परतण्यासाठी नालासोपारा स्थानकात पोहोचले.























