Mumbai : मिरवणूक काढणाऱ्या Abu Aazmi यांच्या विरोधात गुन्हा, सेना नेत्यांवर अद्याप कारवाई नाही?
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना वाढदिवसादिवशी रॅली काढून तलवार फिरवणं भोवलं आहे. या प्रकरणी अबू आझमी यांच्याविरोधात मुंबईतल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे आमदार आझमी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असला युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या कार्यक्रमात गर्दी झाल्यानंतर नगरसेवकासह तीन शिवसैनिकांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. वरुण सरदेसाई, मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग आणि कोविडच्या इतर निर्बंधांची पायमल्ली करण्यात आली. पण सरदेसाई, भुसे आणि गोडसे या नेत्यांवर मात्र गुन्हा का नोंदवण्यात आला नाही असा सवाल उपस्थित होतोय.






















