(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local Train Casualties : तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवासाला 7 जण दगावतात, कोर्टाचे ताशेरे
Mumbai Local Train Casualties : तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवासाला 7 जण दगावतात, कोर्टाचे ताशेरे
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे वाढत्या मृत्युंची हायकोर्टानं बुधवारी गंभीर दखल घेतली. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारे मृत्युदर हे 38.08 टक्के इतकं असून हा जगातील सर्वाधिक मोठा असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. यावर दोन्ही रेल्वे प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश जारी करत सॉलिसिटर जनरल यांना पुढील सुनावणीत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिलेत.
मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघरस्थित यतीन जाधव यांच्या हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर हा 38.08 टक्के असून हाच मृत्यूदर न्यूयॉर्कमध्ये 9.08 टक्के, फ्रान्समध्ये 1.45 टक्के आणि लंडनमध्ये 1.43 टक्के इतका असल्याचं या याचिकेत म्हटलंय.