BJP Morcha Mumbai : चोर मचाए शोर, आदित्य ठाकरेंच्या मोर्चाच्या प्रत्युत्तर म्हणून भाजपचा मोर्चा
BJP Morcha Mumbai : चोर मचाए शोर, आदित्य ठाकरेंच्या मोर्चाच्या प्रत्युत्तर म्हणून भाजपचा मोर्चा
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे१ जुलै रोजी म्हणजेच उद्या मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहेत. आदित्य यांच्या या मोर्चाला महायुती देखील आता प्रत्युत्तर देणार आहे. मोर्चा विरोधात भाजप युवा मोर्चाने रस्त्यावर उतरण्याची रणनीती आखली आहे. चोर मचाये शोर असा या मोर्चातील नारा असणार आहे. भाजपमधील सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली. या मोर्चात भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय देखील सहभागी होणार आहेत. शनिवारी भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून या मोर्चाला सुरुवात होईल. गेल्या 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो कथित भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या


















