Mumbai Cruise Drugs : आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी; अजून दोन दिवस तुरुंगातच मुक्काम
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानचा (Aryan Khan) मुक्काम बुधवारपर्यंत एनसीबी कोठडीतच असणार आहे. कारण आता आर्यनच्या जामीन अर्जावर थेट बुधवारी सुनावणी करण्यात येणार आहे. मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आली होती. परंतु, एनसीबीनं याचिकेवर उत्तर देण्यासाठी मागितला वेळ मागितला होता. या प्रकरणी किमान 2 ते 3 दिवसांचा वेळ देण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली आहे. अशातच आर्यन खानच्या जामीनावर बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश एनसीबीला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आता थेट बुधवारी सुनावणी घेतली जाणार आहे.























