Mumbai :सिद्धीविनायक मंदिरात मध्यरात्री दीड वाजल्यापासूनच बाप्पाचं दर्शन सुरू Angarki Chaturthi 2022
आज अंगारकी चतुर्थी आहे.. कोरोना निर्बंधमुक्तीनंतर आलेली ही पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं आज सकाळपासूनच राज्यातल्या गणेश मंदिरांमध्ये लगबग पाहायला मिळतेय. मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात मध्यरात्री दीड वाजल्यापासूनच बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आलंय. तिकडे रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्यामधील महागणपतीचं दर्शन घेण्युासाठीही पहाटेपासून भक्तांनी रांगा लावल्या आहेत... पुण्याचं दगडूशेठ गणपती मंदीर, नागपूरचा टेकडी गणपती, या मंदिरात आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. निर्बंधमुक्तीमुळे आज भाविकांचा उत्साहही द्विगुणित झालाय. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंह यांनी























