Ananya Pandey ला पुन्हा NCB चौकशीला बोलावलं, Cruise Drugs Party प्रकरणी समन्स
Mumbai Cruise Drug Case : अभिनेत्री अनन्या पांडेला आज पुन्हा एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सकाळी 11 वाजता तिला एनसीबीसमोर हजर राहावं लागणार आहे. शुक्रवारी तिची साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी अनन्या पांडेला (Ananya Pandey) ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते. दरम्यान, एनसीबी (NCB) सध्या मुंबईतीस क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे.























