Amit Shah Mumbai Visit : अमित शाहांची भाजप नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक
Amit Shah Mumbai Visit : अमित शाहांची भाजप नेत्यांसोबत स्वतंत्र बैठक
बॉम्बे नको मुंबई नाव हवं आहे ही मागणी ज्यावेळी केली गेली. मी देखील बॉम्बे नको मुंबई हवी ही मागणी करणारा होतो. त्यावेळी मुंबई समाचारने हेडलाईन केली होती की मुंबईच हवं. नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही मातृभाषा अनिवार्य करणार आहोत. आम्हाला माहिती आहे की याला प्रचंड विरोध होईल, मात्र आम्ही तरी देखील हा निर्णय घेणार आहोत", असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही तर त्यांचं आजोबाशी नातं जोडणार कसं?
अमित शाह म्हणाले, माझं सांगणं आहे की, किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला. जर तुम्ही हे केलं नाही तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धश्रम काढण्याची वेळ येईल. कारण जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही तर त्यांचं आजोबाशी नातं जोडणार कसं? सध्या घरात आई वडिलांना वेळ नसतो वेळ केवळ आजी आजोबांना असतो त्यामुळें मातृभाषा येणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षेत्रात कोणत्याही प्रकरची मागणी न करता केवळ काम करणारा समाज म्हणजे पारसी समाज आहे. या समाजाने फक्त कोणत्याही मागण्या न करता समाजाची सेवा केल्याच पाहिला मिळत आहे. मग ते टाटा असोत की होमी भाभा त्यांनी मोठं योगदान केल आहे.
अल्पसंख्याक समाजामध्ये देखील अल्पसंख्याक समाज आहे
अल्पसंख्याक समाजाच्या विषयासाठी धडपडणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे, अल्पसंख्याक समाजामध्ये देखील अल्पसंख्याक समाज आहे. तो म्हणजे पारसी समाज आहे. झाशीची राणी आणि नरेंद्र मोदी यांचं 2014 सालीच स्वप्न छापणारा एकच पेपर आहे. तो मुंबई समाचार आहे. 1957 चा क्रांती, काँग्रेस स्थापना, मिठाचा सत्याग्रह, अशा सगळ्या गोष्टी आपल्या पेपरने कव्हर केल्या आहेत. स्वतंत्र आंदोलन, इमर्जन्सीवेळी स्वातंत्र्यासाठी धडपणारे लोक या सगळ्यांच रिपोर्ट आपल्या दैनिकाने केलं आहे.
मुंबई समाचारबाबत नरेंद्र मोदी यांच्याकडून कळलं. गुजरातमधील एक प्रमुख दैनिक 200 वं वर्ष सुरू आहे. याचा अभिमान आहे. कोणत्याही संस्थेला 200 वर्ष चालवणं अवघड आहे. त्यात जर तो पेपर असेल तर त्यापेक्षा अवघड आहे. पत्रकारितेत एक गुजराती व्यक्ती काम करत असेल तर तो कशा प्रकारे चांगलं काम करू शकतो याच उदाहरणं मुंबई समाचार आहे.