Jitendra Awhad : भिवंडीपाठोपाठ डोंबिवलीतही आव्हाडांच्या कार्यक्रमाला गर्दी, काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
Dombivali : डोंबिवली पूर्वेकडील राम नगर परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यासाठी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत आले होते कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सल्ले दिले असाच एक सल्ला कोरोना बाबत दिला तिसरी लाट हलक्यात घेऊ नका हा व्हेरियट खूप धोकादायक आहे असं आव्हाडांनी सांगितलं मात्र प्रत्यक्षात याच मेळाव्यात कोरोनाबाबत कोणत्याही नियमांच पालन करण्यात आलं नव्हतं ,सोशल डिस्टसिंग सोडाच पण बहुतांश कार्यकर्त्याना मास्कचा देखील विसर पडल्याचे दिसून आले . सर्व सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उघडणाऱ्या पालिका प्रशासन व पोलीस या मेळाव्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.























