एक्स्प्लोर
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौत अखेर कोर्टात हजर, जावेद अख्तर मानहानीप्रकरणी आज सुनावणी
मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत आज अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिली. आता या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्या नावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली होती. या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. तसेच दंडाधिकारी न्यायालयाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही दिला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत कंगनाला दंडाधिकारी न्यायालयात हजर रहाणं बंधनकारक होतं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
नाशिक
Advertisement
Advertisement


















