(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : 86% लस न घेतलेल्या मुंबईकरांमध्ये Antibodies, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शहरात करण्यात आलेल्या पाचव्या सेरो सर्वेत 86 टक्के लोकांमध्ये कोरोना विरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यातील काही लोकांनी व्हॅक्सिन घेतलं होतं. लस घेतलेल्या 90 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या तर काहींनी व्हॅक्सिन घेतलेलं नव्हतं अशा 80 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. या सर्वेत 24 वॉर्डमध्ये 8 हजार 600 रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहे.
सर्वेत समोर आलेल्या माहितीनुसार अँटीबॉडीज मिळण्याचं प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये समसमान आहे. वयोगटानुसार 18 वर इक्वल डिस्ट्रिब्युशन आहे. झोपडपट्ट्या आणि इमारतीत जास्त फरक नाही. दरम्यान असं जरी असलं तरी नियमांचे पालन केले पाहिजे, असे आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
पहिला, दुसरा आणि तिसऱ्या सेरो सर्वे आणि बालकांच्या सेरो सर्वेत. झोपडपट्ट्यात पहिले कमी असणार वेग वाढत गेला. इमारतीत देखील आधी 16 टक्के होता मग 28 टक्केपर्यंत गेला होता. बालकांमध्ये 51 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. पाचवा अहवाल चांगला अहवाल म्हणावे लागेल. सर्वे करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, की कोव्हिड अॅप्रोप्रिएट बिहेविअरचं पालन करणं गरजेचं आहे.