Dombivli : नव्या गृहसंकुलातील 78 AC वर डल्ला, 5 आरोपींना बेड्या : ABP Majha
डोंबिवलीत एका नवीन बांधकामाच्या ठिकाणाहून चोरांच्या एका टोळीनं चक्क ७८ एसी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी एसी चोरणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. कल्याण शीळ रोड-दावडी परिसरात मोठे गृहसंकुल उभारण्याचं काम सुरु आहे. त्या गृहसंकुलातील प्रत्येक फ्लॅटमध्ये एसी लावून देण्यात येत आहेत. त्यासाठीच या गृहसंकुलाच्या प्रत्येक मजल्यावर एसी आणून ठेवण्यात आले होते. त्याच ७८ एसींवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. काही दिवसांपूर्वी या गृहसंकुलात नोकरी करणारा इसम या चोरीचा मास्टरमाईंड असल्याचं पोलीस तपासात आढळून आलं. तर या पाच चोरट्यांनी वसईमध्ये फेरिवाल्यांप्रमाणे रस्त्यावर उभे राहून एसीची विक्री केलीय.






















