Beed :भरदिवसा वानरांची दहशत,वानरं करतात गावकऱ्यांवर हल्ला ABP MAJHA
बीडच्या लवूळ गावात भरदिवसा वानरांची दहशत पाहायला मिळतेय... ग्रामस्थांना घराच्या बाहेरही पडता येत नाही अशी अवस्था आता लवूळ गावातील नागरिकांवर आलीय... जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला या दोन वानरांनी पुरते बेजार करून सोडलेय.. गावातील वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना आधी मारलं... ही वानरं कुत्र्याच्या पिल्लांना उचलून नेतात, एखाद्या घराच्या छतावर नेऊन ठेवतात मग बिचाऱ्या या पिलांना ना पाणी मिळत ना चारा... त्यामुळे आतापर्यंत शंभर पिल्लांचा मृत्यू झाल्याची माहिती गावकरी सांगतायत... त्यामुळे गावातील कुत्र्यांची संख्या कमी झाली आणि आता ही वानरं गावकऱ्यांवर हल्ला करतायत... त्यामुळे दिवसादेखील घराबाहेर निघता येत नाही...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
