Zero Hour : बारामतीत महायुतीत फोटोवरून संघर्ष? महायुतीत नेमकं काय सुरू ?
Zero Hour : बारामतीत महायुतीत फोटोवरून संघर्ष? महायुतीत नेमकं काय सुरू ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात... महायुतीचं मस्त सुरुय.... उपमुख्यमंत्री अजित पवारही म्हणतात... आमचं नीट सुरुय.... पण, खरंच असं आहे का? की मतदारांना आणि कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जावू नये म्हणून तर हे नेते मंडळी असं बोलत नाहीयेत ना? त्याचं कारण... गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये समोर आलेल्या घटना... त्यातील दोन घटना सांगते... काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणपतीसमोर महायुती सरकारच्या योजनांचा देखावा उभारला होता... त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... शिंदेंचे सगळे आमदार... आणि खासदार श्रीकांत शिंदेंचाही फोटो होता... फोटो नव्हता तो दुसरे उपमुखमंत्री अजित पवारांचा.. विशेष म्हणजे लाडका दादा अजित दादांनी लाडकी बहीण योजनेचे फोटोज राज्यभर पसरवले... त्याच योजनेचा वर्षा बंगल्यावर देखावा होता.. त्यावरही दादांचा फोटो नव्हता... आता दुसरी घटना अवघ्या काही तासांपूर्वीची... ती आहे अजित पवारांच्या बारामतीतून.. इथं एकनाथ शिंदे गणेश फेस्टिवलचं आयोजन शिवसेनेचे पुण्याच्या जिल्हाध्यक्षांनी केलं.. तिथं अजित पवारांना भला मोठा बॅनर लावला... पण, त्यावर काळं कापड लावलं.. ते का लावलं... त्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसा निषेध केला... हे सगळं आपण पुढे पाहणार आहोतच.. मात्र, जसं मी अगदी सुरुवातीला म्हणाले... की राज्यभरातील सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काहीही सुरु असलं तरी... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र... एकजूटता दाखवून दिलीय...