(Source: Poll of Polls)
Zero Hour : हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी; इंदापुरात शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक?
Zero Hour : हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी; इंदापुरात शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक?
भाजपमधील नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. इंदापूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या मेळाव्यापूर्वीच त्यांचा मुलगा आणि कन्या या दोघांनीही तुतारीचं स्टेटस ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यानंतर, आजच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली. मात्र, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाची तारीख ठरली नव्हती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हर्षवर्धन पाटील यांचे पक्षात स्वागत केलं आहे. तसेच, त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही जाहीर केली. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेण्याच्या तारखेवरही आता शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, या निर्णयानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत. शरद पवार यांच्या भूमिकेवरच आता काहींनी प्रश्न उपस्थित केल्याचंही पाहायला मिळालं.
हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला त्यावेळी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केले, त्यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी फुंकण्यासाठी समर्थन दिलं. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेण्याआधी आपण भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. तसेच, मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय. माझ प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं. आता, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ह्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.