एक्स्प्लोर

Zero Hour : Akshay Shinde Encounter : Badlapur Crime : अक्षय शिंदे एन्काऊंटरची 'बदलापूर' फाईल माझावर

Zero Hour : Akshay Shinde Encounter : Badlapur Crime : अक्षय शिंदे एन्काऊंटरची 'बदलापूर' फाईल माझावर

Badlapur Encounter : ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कृत्याचे काही जणांकडून समर्थन केलं जात असून काहींनी अशाप्रकारे आरोपींना ठार मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवाल उपस्थित करत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही याबाबत माहिती देताना पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळी (Firing) झाडल्याचं म्हटलं आहे. मात्र, आमच्या मुलाला साधी गाडी चालवायला येत नव्हती, त्याने फटाकड्याही नीट उडवता येत नव्हत्या. तो बंदूक काय चालवणार अशी प्रतिक्रिया आरोपी अक्षय शिंदेच्या (akshay Shinde) पालकांनी दिली आहे. या घटनेवरुन आता राजकारण चांगलंच तापलं असून ठाणे पोलीस (Police) आयुक्तालयाकडून संबंधित घटनेचा सिनेस्टाईल थरार सांगण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने प्रेस नोट जारी करत घडलेली घटना सांगितली. तसेच, आरोपी अक्षयकडून पोलिसांची बंदूक हिसकावरुन गोळीबार करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसरा, आज 23 सप्टेंबर 2024 रोजी बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं 380/2024 कलम 65(2),74,75,76 भा.न्या. संहिता सह कलम 4(2),8,10 पोक्सो अॅक्ट तसेच गुन्हा रजि.नं 391/2024 कलम 65(2),74,75,76 भा. न्या. संहिता सह कलम 4(2).6.8.10.21(2) पोक्सो अॅक्ट या गुन्हयात अटक व सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी असलेला आरोपी नामे अक्षय अण्णा शिंदे, वय 24 वर्षे यास बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र.नं 409/2024 कलम 377,324,323,504 भा.द.वि या गुन्हयाच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पथक है तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ट्रान्सफर वॉरंटसह गेले होते. 

मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं

प्राथमिक माहिती नुसार, सायंकाळी सुमारे 05.30 वाजता आरोपी यास नमूद पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले व त्यास घेवून ठाणे येथे येत असताना, सुमारे 06.00 वा. ते 6.15 वा. च्या दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले असता, सदर आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 01 राउंड सपोनि/निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व 02 राऊंड इतरत्र फायर झाल्याचे ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. 

स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून गोळी झाडण्यात आली

स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकान्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास लागून तो जखमी झाला. पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस सपोनि निलेश मोरे व आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास उपचारकामी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय, कळवा येथे आणले असता, डॉक्टरांनी तपासून सपोनि निलेश मोरे व इतर पोलीस यांना पुढील उपचारकामी ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे रेफर केले. मात्र, आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास तपासून मृत घोषित केले. सदर मृत आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नियमानुसार सर जे जे हॉस्पीटल, मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहितीही ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
मस्साजोग हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, पवनचक्की प्रकल्पांवर बसणार CCTV ची नजर, पोलिसांच्या 'या' सूचना
Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Allu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्कामABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
मस्साजोग हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, पवनचक्की प्रकल्पांवर बसणार CCTV ची नजर, पोलिसांच्या 'या' सूचना
Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Embed widget