Sambhajiraje Navi Mumbai : 8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमक
Sambhajiraje Navi Mumbai : 8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमक
अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम 8 वर्षा नंतर देखील सुरु झाले नसल्याने स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे आक्रमक झालेत. संभाजीराजे यांनी चला अरबी समुद्रातील शिव स्मारक शोधायला अशी हाक दिलेय. काही वेळातच संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील युनिव्हर्सिटी जवळून या रॅलीला सुरुवात होणार असून याठिकाणी कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेय. शेकडो गाड्यांचा ताफा नेरुळ येथे जमला असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येतेय. यापुढे फसव्या आश्वासनांची पोलखोल स्वराज्य पक्षातर्फे करण्यात येईल असा इशारा स्वराज्य पक्षाकडून देण्यात आलाय.




















