एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेत विकासाची हंडी लागली जाईल, पापाची हंडी आम्ही फोडली; मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकले

आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममधील दहीहंडी उत्सवात सहभागी होत मुख्यमंत्र्‍यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना डिवचलं.

मुंबई : राजधानी मुंबईसह उपनगरातील दहीहंडी (Dahihandi) उत्सवाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील उंचच उंच मनोऱ्यांचे थर पाहायला, सेलिब्रिटींचा डान्स पाहायला गर्दी करतात. तर, सोशल मीडियातूनही मुंबईच्या दहीहंडीचा बोलबोला दिसून येतो. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवात राजकीय पक्षांचाही उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेना, मनसे आणि भाजपच्यावतीने यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे. त्यासाठीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिवसभरात मुंबईतील (Mumbai) 10 ते 15 दहीहंडी उत्सवांना भेट देणार असून दुपारी 1 वाजता त्यांनी वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवापासून याची सुरुवात केली. तर, पत्रकारांशी बोलताना यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचं त्यांनी म्हटलं.  

वरळीतील गोविंदा पथकाने सादर केलेल्या छावा मनोऱ्याचे कौतुक करत मुख्यमंत्र्‍यांनी येथे हंडीही फोडली, त्यानंतर आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममधील दहीहंडी उत्सवात सहभागी होत मुख्यमंत्र्‍यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना डिवचलं. यंदा महानगर पालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे, महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता तिथे विकासाची हंडी लागली जाईल आणि त्यातील लोणी सर्वसामान्यांना वाटलं जाणार, असे म्हणत मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग देवेंद्र फडणवीसांनी फुंकले आहे. आत्तापर्यंत महापालिकेतील लोणी कुठे जात होतं तुम्हाला माहिती आहे.  तुम्ही माझ्या तोंडून काढायचा प्रयत्न करताय, पण जनतेला ही माहित आहे ते लोणी कुणी खाल्लं, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. दुसरीकडे मनसे व शिवसेनेच्यावतीनेही मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून ठाण्यात राजन विचारेंकडून निष्ठेची दहीहंडी फोडली जाणार आहे. 

दरम्यान, पारंपरिक उत्साहात महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. मुंबईत रात्रीपासून पाऊस पडलाय, आज देखील पावसाचे अंदाज आहेत. तरीही गोविंदांच्या उत्सवाचा पाऊस मोठा आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. 

जय जवान पथकाने रचले 10 थर

दरम्यान, मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने 10 थर लावत विक्रम रचला आहे. घाटकोपर येथे मनसेच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने 10 थर रचल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ठाण्यातील वर्तक नगर येथील प्रो. गोविंदा स्पर्धेतून जय जवान गोविंदा पथकाला बाद ठरवण्यात आले होते. मात्र, आज दहीहंडी दिनी जय जवान पथकाने उंचच उंच मनोरा रचत आपली किमया दाखवून दिली. 

हेही वाचा

मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी मनोऱ्यावर 'छावा', कवी कलश अन् संभाजीराजेंचं बलिदान; मुख्यमंत्रीही भावुक

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
तटकरेंकडे नेमका कोणता जादूटोणा? विधानपरिषदेत शिवसेनेकडं अधिक संख्याबळ असतानाही मुलाला आमदारकी मिळाली, कदमांचा टोला
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Shiv Sena Symbol Case : शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंना अपात्र ठरवता येईल का? चिन्हाच्या वादावर काय परिणाम होईल? शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget