Rajyapal Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारींच्या आत्तापर्यंतच्या वक्तव्यांचा सिलसिला काय?
राज्यपाल भगतसिंह कोशयारी... आजपर्यंत हे नाव बऱ्याचदा चर्चेत आलंय...आणि त्यामागे कारण होतं, त्यांनी केलेली वक्तव्य. सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप झाले..आणि त्यानंतर चर्चा होतेय त्यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादांची.... राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यानंतर अनेकदा वाद झालेत. सध्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषय़ी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला, तर विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली. या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होतोय. ते वक्तव्य नेमकं काय ते पाहूयातच पण एकंदरीत आत्तापर्यंतच्या त्यांच्या वादग्रस्त विधानांचा मालिका सुद्धा आपण पाहू























