(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Water Reservoir :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 32 टक्केच साठा, राज्यातील धरणात 31 टक्के पाणीसाठा
मान्सून सक्रिय होऊन महिना उलटला तरी अद्याप धरक्षेत्रावर मात्र पावसाची कृपादृष्टी झालेली नाही. मागच्या वर्षी याच तारखेला धरण क्षेत्रात ५९.३३ टक्के पाणीसाठा असताना यंदा मात्र धरणांत केवळ ३१.२९ टक्केच पाणीसाठा जमा झालाय. पाण्यापासून वीजपुरवठ्यापर्यंतची भिस्त असलेल्या कोयना धरणातही अवघा १९.१० टक्के पाणीसाठा असल्याने राज्यात पाण्याची स्थिती गंभीर आहे. गेल्या महिनाभरात अधूनमधून पडणाऱ्या पावसाने पाणीसाठ्यात केवळ १० टक्के वाढ झाली आहे. तर तिकडे मुंबईच्या धरण क्षेत्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा ३५ टक्केच पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी जुलैच्या पंधरवडय़ापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. तसंच पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं धरणक्षेत्रातही तुरळक पाऊस झालाय. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून केवळ ३२.५२ टक्के पाणी जमा झाले आहे. तसंच जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. मात्र गेल्या वीस-पंचवीस दिवसांत पावसाचा म्हणावा तसा जोर नाहीय.. म्हणून आता हा पाणीसाठा कधी पर्यंत पुरेल हेही पहावं लागणार आहे.