एक्स्प्लोर
Morning Prime Time 7 AM : मॉर्निंग प्राइम टाइम : 17 Aug 2025
सरोजकाई पाटील यांनी अजित पवार यांना बाहेरून आक्रमक वाटले तरी आतून गोड असल्याचे सांगितले. संकटकाळात अजित पवार धावून आल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी डॉक्टर एन डी पाटील साहेब यांचा प्रचंड आदर व्यक्त केला. "या माणसानं कधीच विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी विचार बदलले नाहीत. कधी भूमिका बदलली नाही," असे जयंत पाटील म्हणाले. सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी असून, ती अजित पवार यांच्याकडे व्यक्त झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गोंदियात मोर्चेबांधणी सुरू केली असून, प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याचा आणि इतरांचे स्वागत करण्याचा कानमंत्र दिला. किशोरी तिवारी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन राज ठाकरेंसोबत युती करू नये, अशी मागणी केली. ही युती राज्यातील तीन कोटी जनतेच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. बेचाळीस वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचे स्वप्न सत्यात उतरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात पक्षप्रवेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांमुळे निवडणूक आयोग वादात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये 'वोटर अधिकार यात्रा' काढणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्लीत अकरा हजार कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन तसेच द्वारका एक्सप्रेस वे च्या दिल्ली सेक्शनचेही उद्घाटन होणार आहे. देशातील पहिला आठ लेन एक्सप्रेसवे आता पूर्ण झाला आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग





















