Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोप
Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोप
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, तर दुसरीकडे पोलिस, सीआयडी या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणात होत असलेल्या तपासाची माहिती पोलिस देत नसल्याचा आरोप संंतोष देशमुख यांच्या मुलीने केला आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याबाबत पोलीस सांगत नसल्याचा आरोप वैभवी देशमुखने केला आहे. विचारणा करूनही पोलीस तपासाबाबत सांगत नसल्याचा आरोप वैभवी देशमुखने या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. यापुढे होणाऱ्या तपासाची वेळोवेळी माहिती देण्याची विनंती देखील तिने केली आहे.