एक्स्प्लोर
BMC Polls: '...आणि Sunil Prabhu महापौर झाले', 2012 चा किस्सा सांगत Uddhav Thackeray यांनी पुन्हा देवाला घातलं गाऱ्हाणं
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मागाठाणे येथील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलाच महापौर बसवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 'दोन हजार बारा ला गाहाणं घातलं आणि सुनील प्रभू महापौर झाले, आता पुन्हा आपल्या देवाला गाऱ्हाणं घालावे लागेल आणि मला विश्वास आहे की देव आपला आहे,' असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. पक्षफुटीनंतर शिंदे गट आणि भाजप यांच्या आव्हानाला सामोरे जात असलेल्या ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 2012 साली सुनील प्रभू हे शिवसेनेचे महापौर झाले होते, याची आठवण करून देत, त्याचप्रमाणे यंदाही मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल, असे साकडे त्यांनी देवाला घातले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















