एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार- उद्धव ठाकरे
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'तुम्ही जाहीर केलेल्या तीन-साडेतीन लाखांपैकी दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये टाका,' अशी थेट मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली. सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी फसवणूक आहे, असे ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हंबरडा मोर्चा'ला संबोधित करताना ते बोलत होते. दिवाळीनंतर आपण स्वतः मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही हे तपासणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले. शिवसेना प्रत्येक पावलावर शेतकऱ्यांसोबत राहील आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















